इस्लामपूर नगरपालिकेला अडीच कोटींचे विशेष रस्ता अनुदान; शहाजी पाटील यांची माहिती

इस्लामपूर नगरपरिषदेस विशेष रस्ता अनुदान म्हणून २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील पंधरा ठिकाणचे रस्ते, गटारीची कामे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक शहाजी पाटील यांनी दिली.

    इस्लामपूर : इस्लामपूर नगरपरिषदेस विशेष रस्ता अनुदान म्हणून २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील पंधरा ठिकाणचे रस्ते, गटारीची कामे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक शहाजी पाटील यांनी दिली.

    शहाजी पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्री पाटील यांच्या माध्यमातून आमदार निधी सह वेगवेगळ्या निधीच्या रुपाने सुमारे ८० कोटी रुपये निधी मिळाला आहे.त्यातून गेल्या पाच वर्षात रखडलेली अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. नुकताच ईदगाह मैदान व शादीखाना या कामांसाठी २ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले. त्या कामाचा शुभारंभ राज्याचे अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले. हे काम ही अनेक वर्षे रखडले होते. मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनी काही कायदेशीर व तांत्रिक बाबींचा प्रश्न मिटवून हे काम मार्गी लागले आहे.

    सध्याच्या २ कोटी ५८ लाख रुपयांच्या मंजूर निधीतून प्रभाग क्र.२ मधील मंडले वस्ती मध्ये गटर व रस्ते, प्रभाग ४ मधील तलाठी कॉलनी ते काटकर ओढा ते सुभाष पाटील घर रस्ता सुधारणा करणे, प्रभाग ६ मधील श्रीपादनगर येथे मुख्य रस्ता करणे,संभाजी बुचडे घर ते तिरंगा चौक रस्ता,आनंदराव निकम घर ते मुल्ला घर आर. सी.सी गटर करणे, प्रभाग ११ मधील सिद्धेश्वर नगरमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, प्रभाग ७ मधील शास्त्री नगर येथे अंतर्गत डांबरीकरण करणे.

    प्रभाग १२ मधील रामोशी गल्ली येथे समाज मंदिर बांधणे, प्रभाग १ मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील रस्ता क्र. १०,११ मधील गटर, रस्ते, प्रभाग १० मधील माऊली बंगला ते डॉ विक्रांत खोत रस्ता डांबरीकरण, प्रभाग ८मध्ये आर. सी.सी गटर, क्रॉस ड्रेनेज, प्रभाग ४ मध्ये विद्यनिकेतन स्कुल जवळ अशोक पाटील घरापर्यंत रस्ता सुधारणा, आर.सी.सी.गटर, विलास माने घर ते शिवाजी सूर्यवंशी घर गटर करणे, कुलकर्णी घर ते ऍड. कोपर्डे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे, धनंजय थोरात घर ते धोत्रेकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे ही कामे होणार आहेत.