दैनिक नवराष्ट्र तर्फे विशेष चर्चासत्र व लेखक मुलाखत कार्यक्रम; भुरा’ या लोकप्रिय आत्मकथनाचे लेखक प्रा. शरद बाविस्कर यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार – अभिनेते किरण माने

येत्या 26 फेब्रुवारी रोजी मराठी गौरव भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये वैचारिक कार्यक्रम पार पडणार आहे. दैनिक नवराष्ट्र कडून मराठी गौरव भाषा दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  पुणे – येत्या 26 फेब्रुवारी रोजी मराठी गौरव भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये वैचारिक कार्यक्रम पार पडणार आहे. दैनिक नवराष्ट्र कडून मराठी गौरव भाषा दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृह याठिकाणी पार पडणार आहे. यावेळी मराठी भाषेशी निगडीत मान्यवरांना भेटण्याची नामी संधी पुणेकरांना मिळणार आहे. लोकप्रिय भुरा आत्मकथनाचे लेखक व जेएनयुमधील प्राध्यापक शरद बाविस्कर यांची मुलाखत अभिनेते किरण माने घेणार आहेत.

  चर्चा सत्र 1 मराठी भाषा, साहित्य आणि तंत्रज्ञान

  दैनिक नवराष्ट्रतर्फे मराठी गौरव भाषा दिनानिमित्त विशेष चर्चासत्र व लेखक मुलाखत कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या चर्चा सत्राचा विषय मराठी भाषा, साहित्य आणि तंत्रज्ञान याविषयावर आधारित असणार आहे. यामध्ये माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, लेखक व माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अतुल कहाते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्राध्यापक दिलीप चव्हाण त्याचबरोबर लेखिका व संपादक वंदना बोकील – कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी समन्वयक म्हणून काम पाहणार आहे.

  चर्चा सत्र 2 – समाज माध्यमे, प्रसारमाध्यमे आणि बदलती मराठी भाषा

  कार्यक्रमामध्ये युवपिढीवर आधारित दुस ऱ्या चर्चासत्रामध्ये प्रख्यात माध्यमकर्मी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या माजी प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्लासदादा पवार, पत्रकार प्रथमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या दुस ऱ्या चर्चासत्रामध्ये डॉ. आशुतोष जावडेकर समन्वयक असणार आहेत.

  भुरा आत्मकथनाचे लेखक शरद बाविस्कर यांची मुलाखत – मुलाखतकार अभिनेते किरण माने

  त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली व साहित्य विश्वात आपले वेगळपणाचा ठसा उमटवणारी ‘भुरा’ ठरली आहे. या लोकप्रिय आत्मकथनाचे लेखक प्रा. शरद बाविस्कर (प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी पुणेकरांना आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कठीण परिस्थितीमध्ये शिक्षणाची कास धरुन प्रगतीमार्गावर जाणारे शरद बाविस्कर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही प्रकट मुलाखत लोकप्रिय कलाकार व अभिनेते किरण माने घेणार आहे. या कार्यक्रमाची वेळ दुपारी 3 वाजल्यापासून असून कार्यक्रमाला सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे.