
Shivsena Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर असणारा दसरा मेळावा म्हणजे शिमगा, त्यांचा दसरा मेळावा म्हणजे आमच्या नावाने सतत सुरु असणारा शिमगा आहे. बाळासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून या नेत्यांनी शिवसेना वाढवण्याचे काम केले. तुमच्यावर किती केसेस आहेत. बाळासाहेब पोलीस स्टेशनला जायचे, म्हणून बाळासाहेबांचा झंझावात दिसतोय.
तुम्ही बिर्याणी खायला आला आहात का, तुम्ही त्यांच्या तोंडातला घास मोजणारे आहेत. शिवसैनिकाच्या तोंडात दोन घास गेले तर तुमच्या पोटात का दुखते, कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. कार्यकर्त्याची विचारपूस करावी लागते तेव्हा पक्ष मोठा होतो. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला असला तरी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता.
आजही मी रस्त्यावर उतरून काम करतो. गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने का पोटसूळ उठतोय. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री होणे हे अपेतक्षित आहे का, हिम्मत दाखवली म्हणून येथपर्यंत पोहचलो आहे. तुमच्यातलाच एक मुख्यमंत्री झाला पाहिजे. या सरंजामदारांना हे पटणार आहे का. तुमची मालकी कोणामुळे या लाखो शिवसैनिकांमुळे आहे.
सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर खुर्चीत टुणकन बसले आहेत.
मी देखील सर्वसामान्य कुटुंबातील मराठा आहे. मला त्यांची दुःख कळतात, त्याची जाणीव आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार. या एकनाथ शिंदेंच्या रक्तात थेंब असेपर्यंत मराठ्यांना सांगतो तुम्हाला आरक्षण देणार आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो सर्वांना न्याय मिळेल. हे सरकार तुमचे आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तुम्हाला आरक्षण मिळाले. आपल्यासाठी सरकार आहे.
गोरगरीब जनतेपेक्षा मला हे मुख्यमंत्री पद महत्त्वाचे नाही. येत्या लोकसभेत 48 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. मी जिकडे जिकडे जातो तिकडे लोकं खश आहेत. आपल्याला बाळासाहेबांचे विचार 80 समाजकारण 20 टक्के राजकारण बाळासाहेबांनी शिकवले आहेत. ते पुढे नेऊया..
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर आता शिवसेनेत दोन दसरा मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आता शिंदे गटाकडून महिला नेत्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला असून, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंना तगडे आव्हान निर्माण करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळव्याच्या माध्यमातून आज शिंदे गटाची तोफ धडाडणार असून एकनाथ शिंदे यांच्याशिवाय चार प्रमुख नेते भाषण करणार आहेत. या चार नेत्यांची यादी शिंदे गटाने जाहीर केली असून हे चार नेते आज उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडणार आहेत. रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आणि ज्योती वाघमारे अशी या चार नेत्यांची नावे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होत असून त्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. काही वेळामध्येच कार्यक्रमाला सुरूवात होईल. एकनाथ शिंदे यांचे भाषण साधारणपणे 9 वाजता करतील अशी माहिती आहे. पण त्याआधी जे नेते भाषण करणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत.
शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी केली असल्याची टीका त्यांच्यावर कायम केली जात आहे. तसेच शिंदे गटाची मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले शहाजी बापू पाटीलही आज भाषण करणार आहेत.
गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि वक्ते आहेत. त्यांची भाषणाची वेगळी स्टाईल असून त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे गटावर चांगलंच तोंडसूख घेतलंय. आजही आझाद मैदानावरून त्यांना भाषणाची संधी मिळणार आहे. त्याचसोबत ज्योती वाघमारे या देखील आज भाषण करणार आहेत.
बाळासाहेबांची ती खुर्ची स्टेजवर
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याही वर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार आहे. त्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.