Split in Maratha movement, Jarange tells lies, Barskar Maharaj made serious accusations against Manoj Jarange

  Ajay Barskar Maharaj On Manoj Jarange : आता मला गोळ्या घातल्या तरी चालतील परंतु मी याचा भांडाफोड करणार आहे, असा घणाघाती हल्लाबोल अजय बारस्कर महाराजांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. हा खोटे बोलतो, कधीही उपोषणाला बसतो, काहीही बोलतो, त्यामुळे हा फसवत आहे, असा संशय बारस्कर महाराजांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर (Manoj Jarange) तुफान हल्लाबोल केला.

  रोज खोटं बोलतात असा आरोप
  त्यानंतर आता 10 फेब्रुवारीला आंदोलनाला बसण्याचे याने कोठून नियोजन केले याचा खुलासा देखील बारस्कर महाराजांनी केला. यावेळी बारस्कर महाराजांनी सांगितले की, याला अचानक फोन आला आणि याने मिटींग चालू असताना मी उपोषणाला बसलो आहे, असे सांगितले. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला. अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली आहे.

  अजय महाराज बारसकर काय म्हणाले? (Ajay Maharaj Baraskar on Manoj Jarange)
  मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीदेखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहे ते सांगत होते.

  मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही. आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली.

  माझं काम सत्य सांगणं

  मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला

  जरांगेंच्या मुलांमध्येही अहंकार
  जरांगेची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अंहकार मुलांमध्येही आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आरक्षण संबंधाने सांगतो. आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही. रोज पलटी मारतो तो. सगळ्या मीटिंग कॅमेरावर करतो, याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो म्हणतो.

  जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग
  23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजनगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता.