कल्याण डोंबिवलीतील हिरकणींच्या पहिल्याच सायकल स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घर आणि संसार करत असताना अनेक महिला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाहीत. नेमका हाच धागा पकडून कल्याण डोंबिवलीतील काही महिला पुढे आल्या आणि एकत्र येऊन त्यांनी हिरकणी प्रतिष्ठानची स्थापना केली.

  कल्याण : महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता येण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या हिरकणी प्रतिष्ठानतर्फे (Hirkani Foundation) आयोजित सायकल स्पर्धेला (Bicycle Competition) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ठाकुर्ली (Thakurli) येथील रेल्वे समांतर मार्गावर झालेल्या या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivali) शंभरच्या आसपास हिरकणी सहभागी झाल्या होत्या.

  घर आणि संसार करत असताना अनेक महिला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाहीत. नेमका हाच धागा पकडून कल्याण डोंबिवलीतील काही महिला पुढे आल्या आणि एकत्र येऊन त्यांनी हिरकणी प्रतिष्ठानची स्थापना केली. त्याला आता पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असून त्याचे औचित्य साधून ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ यांनी दिली.

  घरातील सर्व ताण तणाव आणि चिंता विसरून ३०, ४० आणि ५० वर्षे अशा तीन गटांत झालेल्या या सायकल स्पर्धेमध्ये ७५ हून अधिक हिरकणीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, टिळक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, केडीएमसी सहाय्यक आयुक्त कविता हिले, ठाणे जिल्हा सायकल संघटनेचे सचिव बागराव, शासकीय प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठाळे आदींच्या उपस्थितीत या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

  या स्पर्धेतील बाजीगर महिला

  वयोगट ३० ते ४० वर्षे

  १ ला क्रमांक – परीनिता गोसावी
  २ रा क्रमांक – किरण कानसे
  ३रा क्रमांक – तेजस्वीनी शेलटे

  वयोगट ४१ ते ५० वर्षे

  १ ला क्रमांक – निता सोनवानी
  २ रा क्रमांक – शुभांगी मगर
  ३ रा क्रमांक – विभावरी इखे

  वयोगट ५१ ते ६० वर्षे

  १ ला क्रमांक – माधुरी कारंडे
  २रा क्रमांक – श्रृती अग्निहोत्री
  ३ रा क्रमांक – मंजुषा गोरे

  वयोगट ६० वर्षे

  स्पेशल प्राईज
  सुषमा आपटे

  ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ, सचिव मनिषा सुर्वे, सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू निता बोरसे, डिंपल दहीफुले यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. विविध वयोगटातील महिला स्पर्धेकांचा उत्साह चैत्यानाचे वातावरण या सायकल स्पर्धेत निमित्ताने दिसत होते.