क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी केलं अनोख्या पद्धतीने आंदोलन, २३ वर्षाआधीच मंजूर केले होते क्रीडा संकुल

क्रीडा संकुलासाठी पैलवानांचा हा व्हिडीओ आता सर्वत्र पहिला जात आहे आणि या व्हिडिओची आता प्रचंड चर्चा सुरु आहे.

    राज्यामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारची आंदोलने करत असतात. मोहोळ (Mohol) तालुक्यामधील क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी (Wrestlers) केलं अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. सध्या राज्यामध्ये या अनोख्या आंदोलनाची बरीच चर्चा सुरु आहे. मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पैलवानांनी चक्क बैठका मारत आंदोलन केले आहे. सोलापूरमधील (Solapur) मोहोळ तालुक्यासाठी क्रीडा संकुल २३ वर्षापूर्वी मंजूर, मात्र अद्याप कोणत्याही कामाची सुरुवात नाही.

    क्रीडा संकुलासाठी पैलवानांचा हा व्हिडीओ आता सर्वत्र पहिला जात आहे आणि या व्हिडिओची आता प्रचंड चर्चा सुरु आहे. तालुक्यामधील खेळाडू क्रीडा संकुल नसल्याने अनेक मोठ्या अडचणी येत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे क्रीडा संकुल रखडले आहे असे सांगितले जात आहे. तालुक्यामधील क्रीडा संकुलन २३ वर्षाआधीच मंजूर करण्यात आले होते. परंतु त्याचे अजूनही काम सुरु करण्यात आले नाही त्यामुळे मोहोळ तालुक्यामधील पैलवानांनी हा पर्याय निवडला आहे. क्रीडा संकुलन नसल्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

    क्रीडा संकुल नसल्याने खेळाडूंना तर अनेक अडचणी येत आहेतच त्याचबरोबर तालुक्यामधील वृद्ध नागरिक, बालकांचे देखील गैरसोय होत आहे. २३ वर्ष उलटून गेले तरी सुद्धा क्रीडा संकुलन नसल्यामुळे क्रीडा संकुलांचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा मोहोळ तालुक्यामधील ५०० पैलवानांसोबत क्रीडा कार्यालयामध्ये बैठका मारणार असे इशारा आंदोलकांनी दिला आहे. पैलवानांच्या मागण्या पूर्ण होणार की आणखी काही वर्ष क्रीडा संकुलांची वाट पाहावी लागणार हे पाहणे महत्वाचे असेल.