भीष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या खेळाडूंचे यश

नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अहमदनार रायफल अँड पिस्तोल शूटिंग रेंजच्या खेळाडूचे घवघवीत यश मिळवले आहे. 

    अहमदनगर : नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अहमदनार रायफल अँड पिस्तोल शूटिंग रेंजच्या खेळाडूचे घवघवीत यश मिळवले आहे.

    यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदक पटकाविले. यामध्ये अहमदनगर शूटींग क्लबचे १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात गौरव खेडकर याने सिनियर गटात सुवर्णपदक कु. मंजू खाडे हिने सिनियर गाटात रोप्य पदक, कु. श्रावणी भगत हिने सब युथ गटात रौप्यपदक तसेच राज फटांगडे याने सब युथ गटातून कांस्य पदक व रोनक टोकशिया याने {ISSF} कॅटेगिरीमध्ये सिनियर गटात कास्यपदक व १० मी ओपन साईट खेळप्रकारात रोहीत वाघ याने चांगली कामगिरी करत सुवर्ण पदक पटकाविले.

    सर्व यशस्वी खेळाडूना अलीम शेख, ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.वरील सर्व यशस्वी खेळाडूंना अहमदनगर जिल्हा क्रिडा आधिकारी माग्यश्री बिले, क्रिडा आधिकारी दिपाली बोडखे, क्रिडा आधिकारी बॅडमिंटन प्रशिक्षक विशाल गर्जे बाळासाहेब पवार यानी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.