श्रीधर घारपुरे यांचे निधन

    कल्याण : कल्याण शहरातील ज्येष्ठ व हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्रीधर घारपुरे यांचे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निधन झाले. घारपुरे हे अतिशय मनमिळावू व आनंदी स्वभावाचे होते. समाजातील अनेक तरुणांचे व कुटुंबियांचे प्रेरणास्थान होते. कल्याण शहरातील अनेक सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संस्थांशी निगडीत होते. त्यात सार्वजनिक वाचनालय कल्याण, शिशु विकास शिक्षण मंडळ, रोटरी क्लब कल्याण (जिल्हा ३१४२), ज्येष्ठ नागरिक संघ व ब्राम्हणसभा अशा अनेक नामांकित संस्थांचा त्यात समावेश आहे.

    त्यांच्या एकंदरीत स्वभावामुळे कल्याण शहरात त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा घारपुरे, उच्चविद्याविभूषित दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या स्मरणार्थ कल्याणमधील विविध सामाजिक संस्थांनी गुरुवार दि. २८ डिसें रोजी सायं. ६ वाजता सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.