शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरवर घोषणा, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर – ‘या’ वेबसाईटवर मिळेल सविस्तर माहिती

बोर्डाकडून दहावी (SSC Exam Timetable) आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (HSC Exam time table) जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad Tweet About SSC HSC Exam Timetable) यांनी ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे.

    मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी (SSC Exam Timetable) आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (HSC Exam time table) जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad Tweet About SSC HSC Exam Timetable) यांनी ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे.

    बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाकडून परीक्षेचं प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (लेखी)  ४ मार्च २०२२ पासून ते ३० मार्च २०२२ पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in ही वेबसाईट बघा.

    माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) मंगळवार १५ मार्च २०२२ पासून ते सोमवार ४ एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहे. दहावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या वेबसाईटला भेट द्या.

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.