nashik accident

पेठवरून निघालेली एसटी बस पुण्याला निघाली होती. त्यानंतर नाशिकच्या पेठ रस्त्यावरील नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ महामंडळाची बस आणि मिक्सर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे.

    नाशिक: नाशिकच्या (Nashik Accident) पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ मिक्सर ट्रक आणि राज्य महामंडळाच्या लाल परी बसची (St Bus And Mixer Truck Accident) समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक ठार झाला असून बस चालक आणि वाहक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. (Peth Road Accident)

    कसा झाला अपघात?
    बाळू बेंडकुळे असं मृत्यू झालेल्या ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे. दोन्ही वाहनांच्या धडकेत 15 ते 16 प्रवासी जखमी झाले आहेत. पेठवरून निघालेली ही बस पुण्याला निघाली होती. त्यानंतर नाशिकच्या पेठ रस्त्यावरील नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ महामंडळाची बस आणि मिक्सर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. रस्त्याने येत असताना किरकोळ स्वरूपाचा पाऊस असल्याने रस्ते ओले झाले होते. त्यामुळे बस चालकाचे गाडी या रस्त्यावरून स्लिप झाली आणि समोरून येणाऱ्या मिक्सर ट्रकला जाऊन आदळली असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

    पेठ व जुना आडगाव नाका येथील 108 नंबरवर कॉल करून ॲम्ब्युलन्सने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले आहेत. तर काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.