mobile shopping

राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) अकोला आगार (Akola Depot) क्रमांक 2 मध्ये कार्यरत वाहक एस. एस. देशमुख यांना नागपूर येथून बसलेल्या प्रवाशाचा महागडा मोबाईल सापडला. बाजारभावात त्याची अंदाजे किंमत 45 हजार रुपये आहे. तो मोबाईल त्यांनी त्या प्रवाशाला परत केल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) अकोला आगार (Akola Depot) क्रमांक 2 मध्ये कार्यरत वाहक एस. एस. देशमुख यांना नागपूर येथून बसलेल्या प्रवाशाचा महागडा मोबाईल सापडला. बाजारभावात त्याची अंदाजे किंमत 45 हजार रुपये आहे. तो मोबाईल त्यांनी त्या प्रवाशाला परत केल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    अकोल्यातील एसटी वाहक देशमुख नागपूर येथून नागपूर ते पुणे ही बस घेऊन अकोल्यात आले होते. याच बसमध्ये अकोल्यातील वाशीम बायपास रोडचे रहिवासी राजेश मोडक हे अकोल्यात येण्यासाठी बसले. ते रात्री साडेअकरा वाजता अकोल्यात उतरले. त्यानंतर अकोल्यातील त्यांच्या वाशीम बायपास मार्गावरील निवासस्थानी निघून गेले. घरी गेल्यानंतर त्यांना मोबाईल हरवल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी धावपळ करीत खरेदी केलेल्या मोबाईलची पावती सोबत घेऊन बसस्थानक गाठले. त्यादरम्यान अकोला आगारातील उपरोक्त बसगाडीवरील वाहक एस. एस. देशमुख व चालक यांनी एक मोबाईल सापडल्याची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली.

    सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाइल असल्याने त्यांनी हा मोबाईल रिचार्ज करून सुरू केला. त्यानंतर मोबाइल मालकाचा फोन आल्यानंतर त्यांनी फोन उचलला व त्यांचा हरवलेला मोबाइल सुरक्षित असून, बसस्थानकावर येऊन घेऊन जाण्यास सांगितले.