शासनाच्या सवलतीचा एसटीला भक्कम आधार! अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी

राज्य सरकारने अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा सातत्याने तोट्याचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळास झाला आहे. एसटीतर्फे वरील दोन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना प्रवासात सवलत देण्यात येते.

    राज्य सरकारने अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा सातत्याने तोट्याचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळास झाला आहे. एसटीतर्फे वरील दोन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना प्रवासात सवलत देण्यात येते. या सवलतीचा एसटीला भक्कम आधार मिळाला असून या योजनेतंर्गत एसटीने २२१२ कोटी ८८ लाख रुपये कमविले आहेत. (ST earned 2212 crores under Amrit Jyeshtha Nagarika and Mahila Samman Yojana)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षे पूर्ण झालेला ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली. त्यानुसार 26 ऑगस्ट 2022 पासून ही योजना एसटीने प्रत्यक्ष राबवण्यास सुरुवात केली. गेल्या एक वर्षांमध्ये या योजना लाभ २१ कोटी, २६ लाख, ४३ हजार लाभार्थींना मिळाला आहे. या योजनेतून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला आतापर्यंत १०९२ कोटी, ३७ लाख रुपये शासनाकडून मिळाले आहेत.

    तसेच सन. २०२३-२४ चा अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून तिकीट दर ५०% सवलत देण्याची घोषणा केली त्यानुसार १७ मार्च २०२३ पासून. एसटीने महिला सन्मान योजना नावाने महिलांना एसटीच्या तिकीट दर मध्ये ५० % सवलत देण्यास सुरुवात केली .आतापर्यंत सुमारे ४२ कोटी २५ लाख ६२ हजार इतक्या लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रतिकृती रक्कम म्हणून शासनाने एसटी महामंडळाला तब्बल १११९ कोटी ५८ लाख रुपये दिले आहेत.