दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे घेतला निर्णय

दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास (ST) करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गातील गाडीवर १० टक्के वाढ केली आहे.

  पुणे : दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास (ST) करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गातील गाडीवर १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी सुमारे ५० रुपये, तर १०० ते १५० रुपये लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा भाडे द्यावे लागणार आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

  ८ ते २७ नोव्हेंबर या काळात परिवर्तनशील भाडे आकारणी केली आहे. यामध्ये साधी, जलद, निमआराम, शिवशाही या गाड्यांसाठी असे एसटी दरवाढ करण्यात आली आहे, महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

  बसचे नियमित भाडे

  पुणे – नागपूर – २४०५
  पुणे – नांदेड – १५५०
  पुणे – बीड – ८५५