कुख्यात डॉन अरुण गवळीला ‘या’ कारणासाठी पॅरोल मंजूर

अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. 17 नोव्हेंबरला त्याच्या मुलाचं लग्न आहे. मुलाच्या लग्नसंमारंभात उपस्थित राहता यावं यासाठी त्याने कारागृह प्रशासनाकडे आठ दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती.

    नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawali) संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आल आहे. त्याच्या मुलाच्या लग्नसंमारंभात सहभागी होण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. 17 नोव्हेंबरला त्याच्या मुलाचं लग्न आहे.  मुलाच्या लग्नसंमारंभात उपस्थित राहता यावं यासाठी त्याने  कारागृह प्रशासनाकडे आठ दिवसांच्या  पॅरोलची मागणी केली होती.  अखेर त्याला चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.  कारागृह प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताचा खर्च करावा अशा अटी शर्तीसह चार दिवसाचा पॅरोल (Parole) मंजूर केला होता. यासह पाच लाखाची रोख सुरक्षा आणि 5 लाख जमीनदार सादर करण्याची अट घातली होती. यात नागपूर खंडपीठाने पोलीस बंदोबस्ततात जाण्याची अट रद्द करत  सुरक्षा ठेव 1 लाख आणि प्रत्येकी जमीनदार 1 लाख रुपये केली आहे.