प्रतिक्षा संपली…मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर फडणवीस दिल्लीला रवाना

मुख्यमंत्री आजारी असताना आज न्यायालयात (Court hearing) सुनावणी होती. पक्ष व चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आदीवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेले आहेत. त्यामुळं लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

    मुंबई :  शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) अस्तित्वात येऊन एक महिना होऊन गेला तरी सुद्धा अजून राज्यात मंत्रिमंडळ (Cabinet ministers) तयार झालेले नाहीय, त्यामुळं अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले आहेत, त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का, तसेच मंत्रिमंडळावरुन विरोधकांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांच्यावर चांगलाच निशाना साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका, कार्यक्रम रद्द केलत. तर, डॉक्टरांनीही मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळं पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार का? अशी चर्चा सुरु असताना एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री आजारी असताना आज न्यायालयात (Court hearing) सुनावणी होती. पक्ष व चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आदीवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेले आहेत. त्यामुळं लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या किंवा पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे बोललं जात आहे. या मंत्रिमंडळात कोणाकोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अशी सुत्रांची माहिती आहे.