मंत्रिमंडळ विस्तार हालचालींना वेग, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील एका महिन्यात पाच ते सहावेळा दिल्लीली (delhi tour) जाऊन आले आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Ministers) काही होत नाही, त्यामुळं उद्या हे दोघेही पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून, मंत्रिमंडळ विस्तारबाबत पक्षश्रेषठीशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे.

    मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (shinde fadnvis government) अस्तित्वात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी शपथ घेतली. आता याला एक महिना उलटून गेला आहे, तरी सुद्धा राज्यात अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही, त्यामुळं विरोधक आक्रमक होऊन टिका करत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील एका महिन्यात पाच ते सहावेळा दिल्लीली (delhi tour) जाऊन आले आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Ministers) काही होत नाही, त्यामुळं उद्या हे दोघेही पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून, मंत्रिमंडळ विस्तारबाबत पक्षश्रेषठीशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे.


    दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री ‘हर घर तिरंगा’ या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे, त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवारी ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. या दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत, तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा सुटण्याची शक्यता आहे.