राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिका प्रभाग पुनर्रचना जाहिर, पालिका निवडणूक तारीख लवकरच जाहिर होणार

मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबईच्या प्रभाग रचनेबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकांच्या कामाला वेग आलेला दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी रात्री उशीरा जारी केली आहे. मुंबई शहरात एकूण ३२ प्रभागांमध्ये सुधारणा केल्याचा दावा पालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे.

    मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणामुळं लांबणीवर गेलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सकारात्मक हालचाली सुरु आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबईच्या प्रभाग रचनेबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकांच्या कामाला वेग आलेला दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी रात्री उशीरा जारी केली आहे. मुंबई शहरात एकूण ३२ प्रभागांमध्ये सुधारणा केल्याचा दावा पालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे.

    मुंबई क्षेत्र जितक्या प्रभागात विभागता येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. २३६ पर्यंत प्रभाग रचना जाहीर केली असल्यामुळे आता निवडणुकांच्या कामांना वेग येईल. कोणता प्रभाग कुठपर्यंत आहे? याची सर्व माहिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका अधिनियमांच्या कलम ५ च्या तरतूदीखाली मुंबई महागनरपालिकेच्या सभासदांची संख्या २३६ ठेवण्यात आली आहे.

    महानगरपालिकेने नव्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करुन १० मार्च रोजी हरकती सूचनांची कार्यवाही पूर्ण केली होती. या प्रभागरचनेबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. यावर आयुक्तांनी सादरीकरणसुद्धा केले आहे. या प्रभाग रचनेला आयुक्तांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. यावेळी ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला २ आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. त्यामुळं राज्य निवडणूक आयोग लवकरच मुंबई पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे.