state excise department

एका ट्रकमध्ये छुपा कप्पा बनवून लाखो रुपयांची दारू तस्करी (Liquor Smuggling) करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडद परिसरात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वडद येथे दारु तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला (State Excise Department) मिळाली. ट्रकची केबीन (Truck cabin) आणि ट्रॉली (trolley) यामध्ये जागा बनवून ही तस्करी (Smuggling) करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. छाप्याच्या काळात ट्रॉलीची लांबी जास्त दिसत होती. तपास अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आलं. त्यामुळं एक आरोपीला अटक करण्यात आली. इतर आरोपींनी पळ काढला. पळणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे.

    एका ट्रकमध्ये छुपा कप्पा बनवून लाखो रुपयांची दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडद परिसरात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने सबंधित ठिकाणी छापा टाकून २ हजार लिटर स्पिरीट म्हणजेच मद्यार्क जप्त केले आहे. तस्करीसाठी वापरलेल्या या ट्रकमध्ये ड्रायव्हरची केबिन आणि पाठीमागची ट्रॉली यादरम्यान विशेष जागा बनवून मद्य तस्करी केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारावर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली.

    अधिकाऱ्यांनी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये चढून तपासणी केली. ड्रायव्हरची केबिन आणि ट्रॉलीच्यामध्ये वेगळा कप्पा बनवण्यात आल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नटबोल्ट उघडून त्या भागाची पाहणी केली. त्या ठिकाणी दहा ड्रम शुद्ध मद्यार्क म्हणजेच स्पिरीट लपवण्यात आल्याचे उघड झाले. दारूची अवैध निर्मिती करण्यासाठी हे स्पिरीट वापरले जाणार होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. इतर आरोपी फरार झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० लाख रुपयांचा मुद्देमाल याप्रकरणी जप्त केला आहे.