राज्याच्या लसीकरणाला गती देण्यासाठी पुरेसा पुरवठा होत नसल्याचा आरोप, राज्याची केंद्रावर नाराजी

राज्याला ५० लाख कोविशिल्ड (Covishield) आणि ४० लाख कोव्हॅक्सिनची (Covaxin) लसींची गरज आहे.मात्र लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने राज्याच्या लसीकरणाला (Vaccine Shortage In Maharashtra) गती देता येत नाही. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कोरोना आढावा बैठकीत मात्र पुरेसा लसींचा साठा असल्याचा दावा पंतप्रधानांनी (PM Meeting With All State CM) केला, त्यामुळे लसींच्या आवश्यक पुरवठ्यावरून पुन्हा राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई: देशात कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) या बैठकीला उपस्थित होते. मात्र टोपे यांना पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीत बोलण्याची संधीच देण्यात आली नाही. दरम्यान राज्यात लसींचा तुटवडा (Vaccination Shortage) असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत (PM Meeting) आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील लेखी स्वरूपात कळविण्यात आले असून राज्याला ५० लाख कोविशिल्ड आणि ४० लाख कोव्हॅक्सिनची लसींची गरज आहे.मात्र लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने राज्याच्या लसीकरणाला गती देता येत नाही. बैठकीत मात्र पुरेसा लसींचा साठा असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला, त्यामुळे लसींच्या आवश्यक पुरवठ्यावरून पुन्हा राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

    लसीच्या पुरवठ्यावरून नाराजी व्यक्त
    पंतप्रधानानी गैरसमजातून काही जण लसीकरणाला विरोध करत आहेत, याबाबत वक्तव्य केले. मात्र केंद्राकडून काही नियमावली करता येईल का? अशी विचारणाही टोपे यांनी या बैठकी निमित्ताने केली. अडीच लाख प्रकरणांमध्ये ७० टक्के डेल्टा आणि ३० टक्के ओमायक्रॉन आहे. यावरुन डेल्टा अजूनही प्रभावी आहे, त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत अधिक सुस्पष्टता असावी अशी मागणीही केल्याचे टोपे म्हणाले. यावेळी राज्याला वेगाने लसीकरण करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात लस मिळत नसल्याचा मुद्दा टोपे यानी अधोरेखीत केला आहे. यापूर्वी देखील राज्य आणि केंद्र यांच्यात लसीच्या पुरवठ्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.