ठाणेकरांना शिंदे सरकारची खास भेट, ‘इतक्या’ मजल्यांच्या इमारतीला परवानगी

मुंबईनंतर आता ठाण्यात टोलेजंग इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे. कारण ठाण्यात ६० ते ७२ मजली (Permission To High Rise Buildings In Thane) इमारतींना परवानगी देण्यात आली आहे.

    मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने ठाणे(Thane) शहराला मोठी भेट दिली आहे. मुंबईनंतर आता ठाण्यात टोलेजंग इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे. कारण ठाण्यात ६० ते ७२ मजली (Permission To High Rise Buildings In Thane) इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. नगरविकास खात्याने यासंदर्भात आदेश दिले आहेत.

    एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली UDCPR 2020 ला परवानगी देण्यात आली आहे. यानुसार ठाण्यात ७२ मजली इमारती बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामागे ठाण्यातील बिल्डर ल़ॉबीला सुखावण्याचा हेतू तर नाही ना ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

    याआधी मुंबई वगळता राज्यातील अन्य प्रमुख शहरांमध्ये इमारतींच्या उंचीवर असलेले निर्बंध नव्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतून (युडीपीसीआर) हद्दपार करण्यात आले. अग्निसुरक्षेच्या निकषांची पूर्तता होत असेल तर कितीही उंच इमारत उभारण्याची परवानगी यापुढे मिळू शकेल, असे सांगण्यात आले होते. छोट्या शहरांमध्ये मात्र इमारतींच्या उंचीवर ७० मीटर आणि ग्रामपंचायत हद्दीत ५० मीटर्सचे बंधन असेल. गगनचुंबी इमारतींना परवानगी देणाऱ्या वादग्रस्त हाय राईज कमिटीचे अस्तित्वही नव्या नियमावलीमुळे संपुष्टात येत आहे.