शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; एसआयटीमार्फत होणार चौकशी

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या कथित व्हिडिओ प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता ही मागणी मान्य करण्यात आली असून, एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. त्यात आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदेंसोबत गेल्याने माझ्यावर गलिच्छ आरोप करण्यात आले. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले.

दरम्यान, आमदार मनिषा चौधरी, यामिनी जाधव, भारती लव्हेकर यांनी या प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

एसआयटीची घोषणा

या कथित व्हिडिओ प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मान्य करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कॅबिनेटमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.