फक्त चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेचं ते वक्तव्य…आगामी काळात सुद्धा मविआ एकत्र निवडणूक लढविणार – अजित पवार

नाना पटोलेंचं ते वक्तव्य म्हणजे हास्यास्पद असून फक्त आणि फक्त चर्चैत राहण्यासाठी नानांनी हे वक्तव्य केल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात सुद्धा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असून, सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बोलून दाखविली होती. तसेच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. यावर आता महाविकास आघाडीतन प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंचं ते वक्तव्य म्हणजे हास्यास्पद असून फक्त आणि फक्त चर्चैत राहण्यासाठी नानांनी हे वक्तव्य केल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात सुद्धा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोले भाजपातून  काँग्रेसमध्ये आले मग, भाजपने म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक निवेदन केलं, की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं मला नाना पटोलेंचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण, नानाच कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहितीये. ते भाजपमध्ये होते. तेवढ्यावेळपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी हे वाक्य त्यांना बरोबर वाटत असेल. पण, संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करत असतं, असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यांवर टिका केली आहे.

    आमचं तिन्ही पक्षाचे सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चांगले काम करताहेत. तीन पक्ष तसेच महाविकास आघाडीत चांगला समन्वय आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळं आम्ही आगामी काळात सुद्धा एकत्र निवडणूक लढणवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.