सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं आमच्यासाठी नवीन नाही, छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य

आता सरकार पडणार का, असा प्रश्न भुजबळांना (Chhagan Bhujbal) विचारता सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं, नवीन पद्धतीने लढणं, परत निवडणुक लढून मताधिक्य आणणं या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत, असं सुद्धा भुजबळ म्हणाले. शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार असून ते यावर काय करतात? काय मार्ग निघतो का? यावर लक्ष देतील.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. त्यातच आता दिल्लीत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) आहेत. तर राज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस (NCP and Congress) याचं बैठकाचं सुरु आहे. त्यामुळं मविआ बरखास्त होणार का, सरकार कोसळणार का? यावर चर्चा झडत आहेत.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपासोबत सरकार स्थापन करा असे दोन प्रस्ताव पाठवले आहेत. यानंतर आता मविआमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणुका लागू दे, उद्या लागू दे नाही तर परवा लागू दे, राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी (Political party election) नेहमी तयार रहावं लागतं. असं कधी होईल वाटलं नव्हत पण अचानक काय झालं माहित नाही. त्यामुळं सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयार राहवं असं सूचक वक्तव्य केलं आहे.

    आता सरकार पडणार का, असा प्रश्न भुजबळांना (Chhagan Bhujbal) विचारता सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं, नवीन पद्धतीने लढणं, परत निवडणुक लढून मताधिक्य आणणं या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत, असं सुद्धा भुजबळ म्हणाले. शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार असून ते यावर काय करतात? काय मार्ग निघतो का? यावर लक्ष देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहमध्ये तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. पण राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयार राहवं असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केलं आहे.