संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सरपंचाच्या शेतातील लोखंडी जाळी कुंपणाच्या तारा कट करून १० शेळ्या व ६ बोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान लोटेवाडी (ता.सांगोला) येथील सातारकर वस्ती (Crime in Sangola) येथे घडली. 

    सांगोला : सरपंचाच्या शेतातील लोखंडी जाळी कुंपणाच्या तारा कट करून १० शेळ्या व ६ बोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान लोटेवाडी (ता.सांगोला) येथील सातारकर वस्ती (Crime in Sangola) येथे घडली.
    याबाबत सरपंच विजयकुमार उत्तमराव खांडेकर (रा.सातारकरवस्ती, लोटेवाडी) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सरपंच विजयकुमार खांडेकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय खिलार गाई-म्हशींसह एकूण लहान-मोठ्या २६ शेळ्या पाळल्या आहेत. त्यांनी घरापासून सुमारे ४ किमी अंतरावर शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यासह शेळ्यांना बंदिस्त करण्यासाठी लोखंडी तार जाळीचे कुंपण उभे केले होते.
    दरम्यान, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी २६ लहान- मोठ्या शेळ्यांसह बोकड कुंपण जाळीमध्ये बंदिस्त करून ते घराकडे परतले होते. मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता कुंपणामध्ये २६ शेळ्यांपैकी १६ शेळ्या व बोकड कमी असल्याचे निदर्शनास आले.