वायरमन असल्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले; कोरेगाव भीमातील घटना

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका ज्येष्ठ महिलेला अज्ञात चोरट्याने मी वायरमन आहे, लाईट बिल भरायचा शेवटचा दिवस आहे, मंगळसूत्र द्या मी बिल भरतो असे म्हणून महिलेचे मंगळसूत्र घेऊन चोरटा फरार झाला आहे.

    शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका ज्येष्ठ महिलेला अज्ञात चोरट्याने मी वायरमन आहे, लाईट बिल भरायचा शेवटचा दिवस आहे, मंगळसूत्र द्या मी बिल भरतो असे म्हणून महिलेचे मंगळसूत्र घेऊन चोरटा फरार झाला आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील सखूबाई गव्हाणे या आजारी असल्याने कोरेगाव भिमातील एका हॉस्पिटल समोर थांबलेल्या असताना एक अनोळखी व्यक्ती दुचाकीहून आला, त्याने सखूबाई यांना तुमच्या डेअरीचे लाईटबिल थकले आहे आज शेवटचा दिवस आहे. माझ्या सोबत चला असे म्हणून लाईट बिल भरण्यासाठी तुमचे मंगळसूत्र द्या मी बिल भरतो असे म्हणून महिलेचे मंगळसूत्र घेतले,
    दरम्यान त्यांनतर काही वेळात सदर चोरटा फरार झाला, याबाबत सखुबाई रघुनाथ गव्हाणे (वय ७० वर्षे रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.