शेअर बाजार जीवावर बेतला, आर्थिक नुकसानामुळे तरुणाची आत्महत्या

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तसेच कर्जामुळे एका तरुणाने राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चऱ्होली फाटा येथे ही घटना घडली.

    पिंपरी : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तसेच कर्जामुळे एका तरुणाने राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चऱ्होली फाटा येथे ही घटना घडली. समाधान दत्तात्रय आहेर (34, रा. चऱ्होली फाटा, मूळ रा. बार्शी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आहेर यांनी राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समाधान यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखलक करण्यात आले.

    समाधान यांच्या मागे पत्नी, आठ महिन्यांचा मुलगा, आईवडील आहेत. त्यांची पत्नी माहेरी होती. तसेच आईवडील गावी होते. समाधानहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते. त्यात त्यांना नुकसान झाले, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.