Stolen laptop sold to young man in shackles; Bharti University Police action

  पुणे : नामांकित कंपनीचा चोरी केलेला लॅपटॉप विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

  रोहित शंकर साठे (वय २०, रा. गुजरवाडी, कात्रज) असे पकडलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून लॅपटॉप व २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल, असा एकूण पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नायारयण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, राहुल तांबे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध
  शहरात चोरींच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण वाढले आहे. पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार चोरट्यांचा शोध घेत होते. पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना बातमीदाराकडून एक व्यक्ती कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

  महागडा लॅपटॉप व दोन मोबाईल

  तपास पथकाने संबंधित ठिकाणी जावून पाहणी केली असता, एक तरुण तेथे आढळून आला. तरुणाकडे एका नामांकित कंपनीचा महागडा लॅपटॉप व दोन मोबाइल होते. त्याच्याकडे तपास केला असता, लॅपटॉप भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.