चोरीला गेलेले ३३ लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत; पुणे पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त

पुणे पोलिसांच्या परिमंडळ दोनमधील हरवलेले तसेच गहाळ झालेले तब्बल ३३ लाख ४५ हजार रूपयांचे मोबाईल मुळ मालकाला परत केले आहेत. बंडगार्डन, लष्कर, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगांव पार्क तसेच स्वारगेट या सहा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील हे मोबाईल होते.

    पुणे : पुणे पोलिसांच्या परिमंडळ दोनमधील हरवलेले तसेच गहाळ झालेले तब्बल ३३ लाख ४५ हजार रूपयांचे मोबाईल मुळ मालकाला परत केले आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या कल्पनेतून (प्रॉपर्टी मिसिंग) हा उपक्रम राबविले गेला आहे. बंडगार्डन, लष्कर, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगांव पार्क तसेच स्वारगेट या सहा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील हे मोबाईल होते.
    हरवलेल्या व चोरलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांत ‘एक महिन्याची विशेष’ मोहिम राबवण्याबाबत सचूना दिल्या होत्या. यासाठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली तपास पथकातील अधिकारी व दोन अमंलदार यांचे पथक तयार केले होते. या पथकाकने जे मोबाईल मिळून येत नाहीत, अशा मोबाईल फोनच्या आय.एम.ई.आय क्रमांकावरुन संबंधित मोबाईल कंपनीला पत्रव्यवहार केला.
    तांत्रिक विश्लेषणाद्वारे नोव्हेंबर २०२३ मध्ये २३७ मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
    मिळवलेले सर्व मोबाईल फोन हे यातील मुळ तक्रारदार यांना परत करण्यासाठी हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच प्रकरणात तक्रारदारांना एकदा चोरलेले किंवा हरवलेला मोबाईल परत मिळत नाही, असाच अनुभव असतो. पण, पुणे पोलिसांच्या या प्रयत्नामुळे तक्रारदारांना पुन्हा त्यांचा मोबाईल मिळाला आहे. यावेळी तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळला होता.
    ही मोहिम राबवण्याचे आयोजन पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या कल्पनेतून परिमंडळ दोनच्या हद्दीतील सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग व सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर (स्वारगेट विभाग) व सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी बजावली आहे.