राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक; एक महिला प्रवासी जखमी

    राज्यराणी एक्सप्रेसवर कल्याण मध्ये आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान दगडफेक झाली आहे. या घटनेत रेल्वेतून प्रवास करणारी एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

    राज्यराणी एक्सप्रेस आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान धावत असताना अचानक रेल्वे गाडीवर दगडफेक झाली. रखमाबाई पाटील या नावाची महिला यात जखमी झाली असून तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारांनंतर तिचं स्टेटमेंट नोंदवलं जाणार आहे.