
थेनॉलच्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर ते बंद करा, साखर कारखानदारांनी ७० टक्के शिल्लक साखर मार्चनंतर चढ्या दराने विकली त्यामुळे साखरेच्या चढ्या दराचा ४०० रुपये फरक शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
पाच हजार रुपये दर अपेक्षित
शेट्टी म्हणाले जागतिक बाजारपेठेत सध्या साडे सहा हजार रुपये क्विंटल साखरेला दर आहे, मात्र केंद्र शासनाने निर्यात बंदी केली आहे. जर साखर कारखानदार व राज्य शासनाने निर्यात बंदीबाबत केंद्राकडे आवाज उठवला असता तर देशातील कारखान्यांच्या साखरेला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला असता. पाच वर्षापूर्वी एफआरपीनुसार ऊसाचा दर २८०० रूपये टन होता. यात केवळ २०० रूपये वाढ झाली आहे, असे सांगितले.
मुल्यांकन मनमानी व फसवे
कारखान्यांनी शिल्लक साखरेचे मुल्यांकन मनमानी व फसवे दिले आहेत. याची चौकशी व्हावी. इथेनॉल निर्मिती करताना एक टक्का रिकव्हरी जाते. त्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर इथेनॉल कशाला पाहिजे ? ते बंद करा व साखर निर्मिती करा त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असे शेट्टी यानी सांगितले.