
पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, विदर्भ, मराठवाड तसेच कोकण, मुंबई व उपनगरात ढगाळ वातावरणासाह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नागपूर– राज्यात (State) पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कमाल तापमान ३८ अंशापुढे जात असताना ४ मार्चपासून वातावरण ढगाळ झाले आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Rain) ढग घोंगावत आहेत. दोन ते तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील २ दिवस मराठवाडा-विदर्भ (Marthawada and Vidharbha) भागांवर वादळी पावसाचे संकट आहे. ७ ते ८ मार्चला दोन्ही विभागांत विजेच्या कडकडासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शनिवारी-रविवारी विजेच्या कडकडासह पावसाचे हजेरी
रविवारी रात्री अनेक भागात मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाटसह पावसाच्या सरी बरसल्या. रविवारी जळगावमधील चोपडा तालुक्यात सकाळपासून अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. याशिवाय शनिवारी बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळं काढणीला आलेली रब्बी पिके धोक्यात आली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
फेब्रवारीत पाऊस आणि उष्णता…
दरम्यान, पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, विदर्भ, मराठवाड तसेच कोकण, मुंबई व उपनगरात ढगाळ वातावरणासाह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहे. 123 वर्षांमध्ये यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीत सरासरी कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअसल नोंदवले गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शेतीचे नुकसान
अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकारांचे आजार तसेच वातावरणातील बदलामुळं विविध आजार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस म्हणजे 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
आजार बळवण्याची शक्यता
मागील काही महिन्यांपासून वातावरणातील (environment) बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, (Rain) तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी (Cold) सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे.