Strict bandh in Baramati for Dhangar community reservation
Strict bandh in Baramati for Dhangar community reservation

    बारामती : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचे(एस.टी)आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी बारामती शहरातील प्रशासकीय भवन याठिकाणी गेली आठ दिवसांपासून चंद्रकांत वाघमोडे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु असून या आंदोलनाच्या समर्थणार्थ सकल धनगर समाजाच्या वतीने बारामती शहर बंदची हाक देण्यात आली होतो, या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी बारामती ग्रामीणमध्ये धनगर समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली असल्याने बारामती तालुक्यातील सर्व गावांमध्ये बंद पाळण्यात येणार आहे.
    खासदार सुप्रिया सुळे यांचा आंदोलनाला पाठिंबा
    धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी केले आठ दिवसांपासून बारामती शहरातील प्रशासकीय भवन समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिवाळीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत वाघमोडे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा या आंदोलनाला जाहीर केला.
    बारामती शहर बंदची हाक
    राज्य शासनातील जबाबदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन आंदोलकाची भेट घेत नसल्यामुळे आंदोलकासह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल धनगर समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी बारामती शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार बारामती शहरात सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी बारामती ग्रामीण भागात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तसेच इतर भागातील धनगर समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने येऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.