
सकल मराठा समाजाच्या वतीने आज गारगोटी शहर बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा वगळता गारगोटी शहरातील दुकाने, टपऱ्या, व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद (Gargoti Band) पाळण्यात आला.
गारगोटी : सकल मराठा समाजाच्या वतीने आज गारगोटी शहर बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा वगळता गारगोटी शहरातील दुकाने, टपऱ्या, व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद (Gargoti Band) पाळण्यात आला. माजी उपसरपंच जयवंत गोरे म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल’.
मच्छिंद्र मुगडे म्हणाले, ‘मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत आंदोलन केली आहेत. यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका पोहचल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन हाती घेईल, असे मत बजरंग पांडुरंग देसाई, विजय कोटकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी गारगोटी शहरातून निषेध रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली.
नंदकुमार शिंदे, काँ. सम्राट मोरे, शिवराज देसाई, शरद मोरे, प्रा. सुनील मांगले, भुजंगराव मगदूम, संदीप पाटील, आनंदा देसाई (म्हसवे), संभाजी ब्रिगेडचे मानसिंग देसाई, स्वप्निल साळोखे, संजय भारमल आदी उपस्थित होते. यापुढे हुतात्मा क्रांती चौकात बुधवारपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.