
पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांना पुण्यातून पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाबरोबरच इतर समाज, धर्मियांकडूनही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
नवले पुलावर आंदोलक आक्रमक
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांत असलेले पुण्यातील मराठा समाजातील कार्यकर्ते आता आक्रमक होऊ लागले आहे. नवले पुलावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. त्याचवेळी इतर समाजाकडूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा मिळू लागला आहे.
* सर्व पक्षियांच्या कार्यकर्त्यांकडून उपोषण *
भरत मित्र मंडळाच्या वतीने सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे उपाेषण आयाेजित केले गेले. माेदी गणपतीजवळ पार पडलेल्या या उपाेषणात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आरपीआयचे मंदार जाेशी, शिवसेनेचे (ठाकरे गट) राजेंद्र शिंदे, निरंजन दाभेकर, शुभांगी पवार, शाेभा कुडले, सुजाता नालगुडे आदी सहभागी झाले हाेते.
* सकल जैन संघाचा पाठींबा *
मराठा समाजाला अारक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने कार्यवाही सुरु केली असुन, तीला गती देऊन अंतिम निर्णय त्वरीत घ्यावा अशी मागणी सकल जैन संघाने केली अाहे. महराष्ट्र ही संताची, छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमी असुन, येेथे काेणत्याही प्रकारच्या दंगली परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे मराठा समाजाला लवकर न्याय द्यावा अशी मागणी िवजयकांत काेठारी, अॅड. अभय छाजेड, मिलींद फडे, प्रविण चाेरबेले, बाळासाहेब अाेसवाल, सतिश शहा, लक्ष्मीकांत खाबीया यांनी केली अाहे.
* राजपुत समाजाचाही पाठींबा *
मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब अशी माेठी दरी आहे. राज्यात ३५ टक्के इतक्या माेठ्या संख्येने असलेल्या या समाजाचा सर्वांगीण हाेणे गरजेचे आहे. त्यामुळे या समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असल्याचे मत राजपूत साेशल वाॅरियर्स या संघटनेने व्यक्त केले आहे. तसेच राज्य सरकारने राजपूत समाजाच्या विकासाकरिता वीर शिराेमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घाेषणा केली हाेती, तसेच दाखल्यावरील राजपूत भामटा, परदेशी भामटा या नावातून भामटा हा शब्द वगळण्याचे आश्वासन दिले हाेते. त्याची पूर्तता केली नसल्याचा आराेप संघटनेने केला आहे. यासंदर्भात किशाेर राजपुत, राजन काची, अॅड. प्रताप परदेशी,शरद राठाेड, डाॅ. गणेश परदेशी, िवजयसिंह परिहार, सुदेश काची, विकाससिंह हजारे आदींनी मराठा समाजाला पाठींबा देत असल्याचे निवेदन िदले अाहे.
* काेंढव्यात मुस्लीम समाजाचे उपाेषण *
मनाेज जरांगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी काेंढवा येथील दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात अाले. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपाेषण पार पडले. मुस्लिम समाजातील नागरिक यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे युवक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. इम्तियाज शेख, समीर शेख, ओबेद शहा, नदीम शेख मुज्जू शेख, महम्मदिन खान, बापू मुलाणी, राजू आडगळे, शाहबाज पंजाबी आदी उपाेषणात सहभागी झाले हाेते.