parabhani reel death

झेंडावंदनाला जाताना ‘मेला’ चित्रपटातील ‘डर है तुझे किस बात का?’ या गाण्यावर नववीचे 4 विद्यार्थी (Parbhani Accident) रील तयार करत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

    परभणी: दुचाकीवर रील (Instagram Reel Fever) तयार करणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याची घटना परभणीमध्ये (Parbhani) घडली आहे. परभणीमध्ये झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला. यामध्ये दोन विद्यार्थ्याचा मृत्यू (Parbhani Student Accident) झाला आहे. तर, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

    झेंडावंदनाला जाताना ‘मेला’ चित्रपटातील ‘डर है तुझे किस बात का?’ या गाण्यावर हे विद्यार्थी रील तयार करत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान काल एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि आज आणखी एकाचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

    परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावर सकाळी शाळेत झेंडावंदनासाठी नववीचे हे चार विद्यार्थी एका गाडीवर जात होते. अपघातात हे 4 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर या 4 जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हे चार विद्यार्थी शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर रील बनवत असल्याचे समोर आले. हा व्हिडीओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे एका दुचाकीवर 4 जण त्यात मोबाईलवर रिल बनवणे या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडले आहे.

    गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव स्वप्नील चव्हाण असून त्याचा या अपघातात एक हात तुटला. शंतनू सोनवणे या विद्यार्थ्याचा कालच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्वप्निल चव्हाण याचा आज मृत्यू झाला. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच परभणीत ही दुर्दैवी घटना घडली. झेंडावंदनासाठी पाथरीच्या कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे डाकू पिंपरी येथील नववीचे हे 4 विद्यार्थी एकाच टू-व्हिलरवर जात होते. मात्र, त्यांच्या दुचाकीला ऑटोने धडक दिली. हा अपघात सकाळी 7 वाजता घडला. अपघात इतका भीषण होता की, एका विद्यार्थ्याचा हात रस्त्यावर तुटून पडला. अपघातात शंतनू आणि स्वप्निल चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.