Student fined Rs 7,000 for beating center head, District and Sessions Court verdict

हा निकाल वर्धा येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दिला. या प्रकरणी न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने एकूण ८ साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षाने दिलेला पुरावा आणि केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी विशाल किसनराव साबळे याला कलम ५०६ आणि ३२३ अन्वये ७,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

    वर्धा : परिक्षेमध्ये कॉपी करू न दिल्यामुळे परिक्षा केंद्रप्रमुखाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला कारावासाऐवजी सुधारण्याची संधी देऊन ७ हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा दिली आहे. हा निकाल वर्धा येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दिला. या प्रकरणी न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने एकूण ८ साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षाने दिलेला पुरावा आणि केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी विशाल किसनराव साबळे याला कलम ५०६ आणि ३२३ अन्वये ७,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून फिर्यादी डॉ. श्यामप्रकाश आसाराम पांडे यांना देण्याचा आदेश मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दिला आहे.

    सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या बाजूने श्रीमती रत्ना आर. घाटे यांनी साक्षीदारांचे बयाण आणि मौल्यवान युक्तिवाद केला. तसेच विजय तोडसाम यांनी सदर प्रकरणाचा मोलाचा तपास केला. सहायक पोलिस उपनिरीक्षक अजय खांडरे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली. सरकार पक्षाला मदत केली. न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी आरोपीला सुधारण्याची संधी दिली आहे. प्रोबेशन ऑफ अफेन्डर अॅक्टचे कलम ३ व ५ नुसार आरोपीचे वय आर्थिक स्थिती अपराध स्वरूप व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायाधीशांनी भविष्यात अशा स्वरूपाचा गुन्हा न करण्याची ताकीद देण्यात आली.   

    काय होते प्रकरण ?

    पोलिस ठाणे आर्वी येथे दाखल फिर्यादीनुसार डॉ. श्यामप्रकाश आसाराम पांडे यांनी १४ मे २०१६ रोजी तक्रार दिली होती. त्यांना कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे परिक्षा केंद्रप्रमुख या पदावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी आदेशित केलेले होते. परिक्षा सुरु असतांना परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून फिर्यादी यांनी परीक्षा रूममध्ये राऊंड मारत असतांना एका विद्यार्थिनीजवळ कॉपी मिळून आल्याने तिच्याकडून कॉपी पकडण्यात आली. पेपर संपल्यानंतर यातील फिर्यादी डॉ. श्यामप्रकाश पांडे हे महाविद्यालयाच्या नेटजवळ उभे असताना आरोपी विशाल किसनराव साबळे यांनी कॉपी पकडण्याच्या कारणावरून फिर्यादींना महाविद्यालयाच्या गेटवर अडवून त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून तुम्ही विद्यार्थ्यांना कॉप्या करू दया, त्यांना पकडू नका किंवा अडवू नका, अन्यथा तुम्हाला जिवाने मारू, असे सांगून हाताबुक्याने तोंडावर मारहाण केली. तर, पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.