उत्तरखंडच्या विद्यार्थिनीची पुण्यातील FTII मध्ये आत्महत्या

पुण्यातील एफटीआय संस्थेत शिक्षण घेणारी एका 28 वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून तिचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे.

    पुणे : पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेमध्ये (FTII) पुन्हा एकदा आत्महत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका 28 वर्षाच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी मुळची उत्तराखंडच्या नैनीताल मधील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेले नाही.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एफटीआय संस्थेत शिक्षण घेणारी एका 28 वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून तिचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे. सध्या पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणी तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात येत असून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. यापुर्वीही 5 ऑगस्टला एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्यानंतर महिनाभरात ही दुसरी आत्महत्या झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.