वडगाव मावळ पोलिसांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी केली राखीपौर्णिमा 

पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा - सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही.

  वडगाव मावळ : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज मंगळवार (दि २९ )
  रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे एच.आर बाफना डी.एड. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष वडगाव पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक कुमार कदम आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
  यावेळी पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा – सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. हा सण भावनिक असून भाऊ बहिणीचे नाते वृद्धिंगत होते.पोलीस हा मुली व महिलांसाठी त्यांचा‌ दादा असतो, तसेच विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा तसेच यशस्वी जीवनाबाबत मार्गदर्शन केले.
  “प्रा.राजेंद्र डोके म्हणाले गेली पाच वर्षांपासूनरक्षाबंधन कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये साजरा करत आहोत. पोलीस विद्यार्थी संवाद तसेच नाते दृढ होते.विद्यार्थिनी सोनाली केदारी म्हणाली स्वतः च्या भावासोबत पोलीस दादा पण आपले रक्षण करतात,त्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण त्यांच्यासोबत साजरा करणे ही सामाजिक बांधिलकी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शुभांगी हेंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज गायकवाड यांनी केले. आभार
  प्रा. शीतल गवई यांनी मानले.
  यावेळी पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस अंमलदार सुनील मगर, भाऊसाहेब खाडे,श्रीशैल्य कंटोळी,आमोल तावरे,आशिष काळे,उमाजी भुंडे, अंकुश पाटील प्रा मनोज गायकवाड, प्रा राजेंद्र ढोके, शुभांगी हेदरे,आदीसह बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या