
सदर जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांचे आई-वडील व नातेवाईक मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे.
अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथील जे. डी .पाटील महाविद्यालयातर्फे (J D Patil, Collage) राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून तालुक्यातील जैनपूर (Jainpur) येथे राष्ट्रीय सेवा शिबिर सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिराचा आज शेवटचा दिवस होता . शिबिर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या वतीने भाड्याने ट्रॅक्टर करून दर्यापूरकडे पाठवले. विद्यार्थी हे ट्रॅक्टरने दर्यापूरकडे येत असताना जैनपूर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला (The tractor overturned when the driver lost control). या ट्रॅक्टर मधील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत.
सदर जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांचे आई-वडील व नातेवाईक मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. काही वेळ तणावाचे वातावरण सुद्धा हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेले होते घटनास्थळी दर्यापूर पोलीस दाखल झाले असून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
अमरावती येथील शासकीय रुग्णालयात व काही विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात तर एका विद्यार्थ्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर राबवले जाते. विद्यार्थ्यांची चांगली व्यवस्था करण्याचे काम हे कॉलेज प्रशासनाचे आहे मात्र या कॉलेज प्रशासनाने कुठेतरी हलगर्जीपणा केल्याचं दिसत आहे. परत येताना एकच ट्रॅक्टर ट्रॉलीत ४६ विद्यार्थी कोंबून विद्यार्थ्यांना आणले जात होते असे जखमी विद्यार्थ्यांनी सांगितलं.
या अपघातात जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना परत आणत असताना ट्रॅक्टरची व्यवस्था केल्याने पालक संतप्त झाले व यापुढे तरी महाविद्यालयाने काळजी घ्यावी अशी विनंती पालकांनी केली आहे.