
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील स्थानीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक राजेश नामदेव वाघ यांना आज पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलेले आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील स्थानीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक राजेश नामदेव वाघ यांना आज पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलेले आहे.
राजेश नामदेव वाघ हे पाच मार्च 1988 रोजी पोलीस खात्यात रुजू झाले होते. गेली 35 वर्षे सहा महिने ते पोलीस खात्यात आपले कर्तव्य निभावत आहेत. या अगोदर सुद्धा त्यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे.
1988 पासून ते आतापर्यंत पोलीस खात्यात केलेली सेवा डिटेक्शन कठोर परिश्रम व इतर कामगिरी उत्कृष्टरित्या केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांचे सकारात्मक शेरे त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांना या जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकाबद्दल पोलीस खात्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.