ठाकरे गटाला मोठा धक्का; आणखी एका नेत्याने सोडली साथ, मुख्यमंत्र्यांनी भर पत्रकार परिषदेत म्हटलं…

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सुभाष देसाई (Subhash Desai) शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्याच मुलाने आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘हे काम करणारं सरकार आहे, हे सर्वांना माहीत आहे. मला सोबत काम करायचं असे भूषण देसाई यांनी मला सांगितलं, त्यामुळे ते आमच्यासोबत आले आहेत. भूषण देसाई यांनी जो निर्णय घेतला काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी विकास व्हिजन समोर ठेऊन निर्णय घेतला आहे’.

एकनाथ शिंदेंचं काम जवळून पाहिलं

हिंदुत्त्वाचा विचार, साहेबांचे स्वप्न पुढे कोण घेऊन जात असतील तर ते आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही एकमेकांनी सोबत काम केले आहे. त्यांचं काम मी जवळून पाहिलंय. त्यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचे काम पाहून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाला आहे, असे भूषण देसाई यांनी पक्षप्रवेशादरम्यान म्हटले आहे.