सिरसेच्या सिद्धेश्वरमध्ये सुभाष पाटलांचे निर्विवाद वर्चस्व; एकहाती सत्ता काबीज

सिरसे (ता.राधानगरी) येथील सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी बापूसो गणपती पाटील सत्तारूढ विकास आघाडीने १३-० करत निवडणूक एकतर्फी जिंकली.

  भोगावती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सिरसे (ता.राधानगरी) येथील सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी बापूसो गणपती पाटील सत्तारूढ विकास आघाडीने १३-० करत निवडणूक एकतर्फी जिंकली. विरोधात सिद्धेश्वर शेतकरी विकास परिवर्तन विकास आघाडीला विरोधी सिद्धेश्वर परिवर्तन विकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

  सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेत गेली वीस वर्षे एकहाती सत्ता सरपंच सुभाष पाटील यांची आहे. यावर्षी पहिल्यांदाच सुभाष पाटील यांच्या विरोधात तंटामुक्तचे अध्यक्ष वसंतराव पाटील, माजी सरपंच वसंतराव पाटील, राष्ट्रवादीचे अशोक पाटील, सुरेश पाटील, सरपंच तानाजी दौलु पाटील यांनी आघाडी केली आहे.

  सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविणार आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले. तरीही सामान्य सभासदांना विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदान केले आहे. सभासदांच्या विश्वासाला विश्वासाला तडा जाऊ नदेण्याचा दावा सुभाष पाटील, आ.रा.पाटील, राजेंद्र लोखंडे यांनी केला आहे.

  सत्ताधारी आघाडीतील विजयी उमेदवार असे…

  सुभाष शामराव पाटील, निवृत्ती सूर्याजी चौगले, पांडुरंग विष्णू चौगले, आणासो बाबुराव पाटील, कृष्णा दत्तू पाटील, धुळाप्पा विष्णू पाटील, बापूसो बंडोपंत पाटील, बाळासो दत्तात्रय लोखंडे, सुवर्णा बळवंत धुरे, संगीता बापूसो पाटील, शिवाजी आनंदा सुतार, निशिकांत, राजाराम कांबळे, तमायचे राकेश दिलीप.

  पी.एन. पाटील यांच्या बॅनरखाली निवडणूक लढवली

  मी आमदार पी. एन. पाटील यांना मानणारा कार्यकर्ता असून कोणतीही सत्ता नसताना ग्रामपंचायत व सेवा संस्था दूध संस्थेत एकहाती सत्ता राखली आहे. निवडणूक पी एन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजीव पाटील यांच्या बॅनरखाली लढवून तेरा झेरोने सत्ता आणली आहे.