भाकड जनावरांसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; रघुनाथ पाटील यांची मागणी

राज्य सरकारने भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.

    पुणे : पावसाची अनियमितता, कायम दुष्काळी परिस्थिती अशा वेळी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.

    कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले. कुरेशी समजाच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आले असता ते बेलत हेते.

    पुणे जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन कत्तलखाने चालू करावेत, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचा मुद्देमाल परत मिळावा, आमचा व्यवसाय करीत असताना गुंड प्रवृत्तीकडून होणारा अन्याय तात्काळ थांबवावा, महाराष्ट्र सरकारने कुरेशी समाजाला न्याय द्यावा, या मागण्यांसाठी कुरेशी समाजाच्या वतीने यावेळी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

    यावेळी ऑल इंडिया जमियतुल कुरेशी एक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, शहराध्यक्ष हसन कुरेशी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्य्सह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व मुस्लिम समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.