
आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षा करवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्वाचे ठरतात. कित्येकजण कठोर मेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते.
मुंबई : ‘बारावीच्या परीक्षेनंतर (HSC Exam) करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी अभ्यासाची मेहनत घेतली जाते. म्हणूनच बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बारावी उत्तीर्णांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी, दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवले आहे, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ‘परीक्षा एक टप्पा आहे. त्यामुळे यात यश न मिळालेल्यांनी खचून न जाता, नव्या उमेदीने प्रयत्न करावे. यश तुमचेच असेल,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आव्हाने म्हणजे एक परीक्षाच…
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षा करवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्वाचे ठरतात. कित्येकजण कठोर मेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते. बारावीच्या परीक्षेत असे यश मिळविणाऱ्यांचे आणि त्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.’
राज्याचा निकाल 91.25 टक्के
फेब्रुवारी-2023 मध्ये पार पडलेल्या 12 वीच्या परीक्षेत (Exam) राज्याचा निकाल 91.25 इतके टक्के लागला आहे. निकालात मुलींनी (Girls) बाजी मारल्याचं दिसतंय. 17 नंबरचा फॉर्म बरुन खासगीरित्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल 82.39 टक्के इतका लागलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घटलेला आहे. (HSC Result 2023) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
मुलीच भारी…