मविआच्या मोर्चाची जय्यत तयारी, लाखो कार्यकर्ते येणार, कोणकोणते नेते लावणार हजेरी? ; पहा महामोर्चाचा टीझर Video

सत्ताधारी राज्य सरकारविरोधात 17 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस सातत्यानं यासाठी मविआच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे सोडल्यास सर्वच राजकीय पक्ष, संघटना या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे

  सत्ताधारी राज्य सरकारविरोधात 17 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस सातत्यानं यासाठी मविआच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे सोडल्यास सर्वच राजकीय पक्ष, संघटना या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. कशी सुरुये या मोर्चाची तयारी आणि कोणकोणते नेते यात सहभागी होणारेत. यावर एक नजर टाकूयात

   

   

  -विराट मोर्चासाठी महाविकास आघाडी सज्ज

  -मुंबईत 17 डिसेंबरला विरोधकांचं शक्तिप्रदर्शन

  -राज्यपाल हटाव, सीमावादावर आक्रमक पवित्रा

  -राज्यभरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होणार

  सगळ्याच विरोधी पक्षांच्या दिग्गजांची उपस्थिती

  सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी, १७ तारखेला मुंबईत महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांचं मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लाखोंच्या संख्येनं या विराट मोर्चात सहभागी होतील.

  मविआचा विराट मोर्चा कशासाठी ?
  -राज्यपाल कोश्यारी, भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान
  -सीमा भागातील मराठी बांधव, कर्नाटक मुख्यमंत्र्यांना विरोध
  -सत्ताधारी नेत्यांची महिलांबाबतची बेताल वक्तव्यं
  -राज्यातील उद्योगांचं स्थलांतर, पळवापळवीला विरोध

  हा विराट मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असेल असा विश्वास विरोधकांकडून व्यक्त होतोय.राज्यभरातून या मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांचं नियोजन सुरु आहे. एकट्या पुण्यातून राष्ट्रवादीचे १० हजार कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.

  कसा असेल मोर्चाचा मार्ग?
  वीर जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान
  साडे पाच किलोमीटरचे अंतर मोर्चा चालणार
  मोर्चाला एकूण दोन ते तीन तास लागण्याची शक्यता

  या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, शेकाप, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड हे पक्ष आणि संघटना सहभागी होणार आहेत.

  कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती?

  शिवसेना ठाकरे गट
  उद्धव ठाकरे
  आदित्य ठाकरे
  संजय राऊत
  विनायक राऊत
  अरविंद सावंत

  काँग्रेस
  नाना पटोले
  अशोक चव्हाण
  बाळासाहेब थोरात
  भाई जगताप

  राष्ट्रवादी काँग्रेस
  अजित पवार
  सुप्रिया सुळे
  जयंत पाटील
  छगन भुजबळ

  या नेत्यांच्या उपस्थितीत शिंदे सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात येणार आहे. दुसरीकडं सत्ताधारी या मोर्चावर टीका करताना दिसतायेत.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. तसेच छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे या मोर्चाला उपस्थिती लावतात का, याकडंही सगळ्याचं लक्ष असेल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच होणारा हा विराट मोर्चा शिंदे सरकारसमोर आगामी काळात आव्हान निर्माण करणारा ठरेल. राज्यातील येत्या काळातील निवडणुकांचे प्रचाराचे मुद्देही या मोर्चात स्पष्ट होणार आहेत.