इंडियाची मुंबईतील बैठक म्हणजे गंमत आहे, कोणाची हिम्मत आहे मुंबई तोडायची? – सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर म्हणजेच इंडियावर आपले टीकास्त्र सोडले आहे.

    सुधीर मुनगंटीवार : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या अनेक बैठका सुरु आहेत. याचदरम्यान वन तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर म्हणजेच इंडियावर आपले टीकास्त्र सोडले आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, इंडिया ची मुंबईतील बैठक म्हणजे गंमत आहे. काल पवार म्हणाले मोदी साहेबांनी आरोप केले तर चौकशी व्हायला हवी, होय चौकशी होणार आहे. काल पवार यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसले होते म्हणून तर पवार म्हणाले नाही ना? असा प्रश्न आम्हाला पडला आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, काल एक नेता म्हणाला मुंबई तोडणार, कोणाची हिम्मत आहे मुंबई तोडायची ? शरद पवार यांनी आराम करावा ही त्यांच्या पक्षांच्या लोकांचीही इच्छा होती मात्र अनेकांना मोह सुटत नाही. भारतरत्न परत घेत येत नसतो. फायलींचा प्रवास अंकुश ठेवण्यासाठी नाही तर समन्वय राखण्यासाठी फाईल्स अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि नंतर मुख्यमंत्र्याजवळ जातील. तुम्हाला आमच्याशी लढायचं तर एक सेनापती ठरवा. पंतप्रधान पदाचा उमेदवार का ठरवत नाही? नुसते बोर्ड बॅनर लावतात. वन्यप्राण्यांकडून शेती नुकसान याबाबत कमिटी आहे, आणि वन अधिकारी यात लक्ष देत नसतील तर अशा लोकांवर कारवाई होईल.

    पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमच्याशी लढायचं आहे तर तुमचा सेनापती तरी ठरवा तुमच्यामध्ये ताकद नाही हिम्मत नाही. असे घाबरतात हे जर तुम्हाला देशाची सेवा करायची आहे का नाही मग पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवत. देश प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी हे आमचं ब्लुप्रिंट आहे हे करायचं नाही नुसतं बोर्ड बॅनर लावले आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेसची आहेत आणि केजरीवालाची आहेत. जनतेने समजून घायचा आहे देशाला विश्वगौरव एकदा देश अधोगतीची मार्गावर जावं हे जनतेने ठरवावं असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.