
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या आग्रहातून मराठवाडा विकासासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
नागपूर – सुधीर मुनगंटीवार : आज वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूर मध्ये होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भात भाष्य केले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये, संवादातून प्रश्न सुटतात. आरक्षणाच्या बाबतीत संविधानाच्या चौकटी बाहेर सरकार म्हणून कोणतीही कृती करणार नाही. याप्रसंगी प्रश्न हे संवादातून सुटणार आहेत. अजून कृती झालेली नसताना उपोषण करण्याची आता गरज नाही. यावर संवाद आणि चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोणावर अन्याय होणार नाही असे सांगितले आहे असे सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नाना पाटेकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाना पाटेकर यांनी कुठलीही टीका केली नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं मी अभिनंदन करतो. सरकारच अभिनंदन करतो या ट्विटमध्ये जे वाक्य वापरतो कोणासाठी आणि कशासाठी वापरतो या लोकांनी हा देश लुटला त्याविरुद्ध कृती अपेक्षित आहे. त्यांनी सरकारवर टीका केली नाही तुम्हाला अर्थ समजला नसेल तर त्यांना विचारू शकता.
संजय राऊतांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये अमित शहा होते का असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर बोलताना मग उद्धव ठाकरे त्यावेळेस होते का असा प्रति प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कदाचित त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणत असतील. राहुल गांधी तिरंगा झेंडा फडकवतात मग त्यांचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी काही संबंध आहे का. असं बोलणं आश्चर्यकारक आहे. काही लोक विषारी शब्दाचा उपयोग करतात असा टोला संजय राऊत यांना लगावला
काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेला दुःख, वेदना, अविकास व्यतिरिक्त काहीही दिलं नसता त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? आम्ही न्याय देण्यासाठी निघालो तेव्हा संशयाचे धुकं निर्माण करायचे. स्वतः मात्र वैधानिक विकास मंडळ गुंडाळून बसले आहेत. काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेकडे जाऊन माफी मागितली पाहिजे की आम्ही मराठवाड्याच्या विकासात कमी पडलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या आग्रहातून मराठवाडा विकासासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. काँग्रेसने सत्तेसाठी फक्त मराठवाड्यात दौरे केले आणि खुर्ची एक खुर्ची एवढंच काम काँग्रेसने केलं आहे. यांना स्वप्नातही खुर्ची शिवाय काही दिसत नाही असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर लगावला.