दौंड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला अन् बळीराजा सुखावला

दौंड तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या पावसाने (Rain in Daund) हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

  पाटस : दौंड तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या पावसाने (Rain in Daund) हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

  दौंड तालुक्यात 1 ते 12 जूनपर्यंत 271 मिलिमीटर पाऊस झाला. ही माहिती दौंड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक विजय विप्पर यांनी दिली. दौंड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.11) तालुक्यातील पाटस, केडगाव परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. तरी इतर ठिकाणी रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.

  कोणत्या भागात किती पाऊस –

  – यवतला 10 मिलीमीटर, पाटस 34 मिलीमीटर, केडगाव 26 मिलीमीटर, देऊळगाव राजेला मात्र हुलकावणी दिली.

  – रावणगाव 4 मिलीमीटर, वरवंड 9 मिलीमीटर, दौंड व राहू 6 मिलीमीटर

  – एकूण 95 मिलीमीटर पाऊस झाला. तर 1 ते 11 जूनपर्यंत तालुक्यात एकूण 271 मिलिमीटर पाऊस झाला.

  – यवतला 66 मिलीमीटर, पाटस 34 मिलीमीटर, केडगाव 45 मिलीमीटर, देऊळगाव राजे 15 मिलीमीटर, रावणगाव 19 मिलीमीटर, वरवंड 42 मिलीमीटर, दौंड 14 मिलीमीटर तर राहुला 36 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

  तालुक्यातील मंडल याप्रमाणे पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल सहाय्यक विजय विप्पर यांनी दिली.

  दरम्यान, सर्वात जास्त पाऊस यवत परिसरात झाला. तसेच पाटस , वरवंड आणि केडगावला बऱ्यापैकी हजेरी लावली तर देऊळगाव राजे, रावणगाव, राहू, दौंड परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.