cng

सध्या पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे अनेक वाहनांमध्ये सीएनजीचा पर्यायी इंधन म्हणून वापर केला जात आहे. पण आता महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योग आता बायोगॅस निर्मितीकडे वळले आहे. या माध्यमातून सीएनजी (CNG Production) निर्मिती केली जाणार आहे.

    अहमदनगर : सध्या पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे अनेक वाहनांमध्ये सीएनजीचा पर्यायी इंधन म्हणून वापर केला जात आहे. पण आता महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योग आता बायोगॅस निर्मितीकडे वळले आहे. या माध्यमातून सीएनजी (CNG Production) निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत बायोगॅस प्रकल्पाच्या मागणीत देशभरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    जर्मनीतील कंपनीशी अहमदनगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतील साखर उद्योगांसाठी लागणारे बॉयलिंग हाऊस (प्रकल्प) तयार करणाऱ्या श्रीजी या इंजिनियरिंग उद्योगाने बायोगॅस प्रकल्प निर्मितीसाठी नुकताच करार केला आहे. राज्यातील साखर उद्योग बायोगॅसच्या प्रकल्पातून निर्मित सीएनजी वितरणासाठी स्वतःच्या जागेत सीएनजी पंप सुरू करून इंधनावर होणारा खर्च वाचवण्याबरोबरच अन्य वाहनांना सीएनजीचे इंधन पुरवणार आहे.

    युरोप व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विविध सेंद्रिय खत साठा वापरून हा उद्योग समूह जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक बायोगॅस प्रकल्प उभारून भारतासह विविध देशातील साखर उद्योगांना हे तंत्रज्ञान देणार आहे.

    केंद्राकडून अनुदान

    बायोगॅस प्रकल्पासाठी 50 कोटी रूपये खर्च येतो. केंद्राने अशा प्रकल्प निर्मितीसाठी कारखान्यांना क्षमतेनुसार 25 लाख ते 10 कोटींचे अनुदान सुरू केले आहे. बायोगॅसच्या माध्यमातून सीएनजी इंधनाबरोबरच वीजनिर्मितीही केली जाणार आहे.