विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ‘ऊस तोडणी बंद’ आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. उसाला एक रकमी एफआरपी मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी, त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा इत्यादी मागण्या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या आहेत.

    सांगली : सध्या राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र मागील काही वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या एकरकमी एफआरपी समाधानकारक मिळत नसल्यानं शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवला आहे, तसेच राज्यव्यापी आंदोलन केले आहे. सध्या ऊसाच्या एकरकमी एफआरपी सहा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून “ऊस तोडणी बंद” आंदोलन सुरू झाले आहे.

    आज राज्याच्या विविध भागात “ऊस तोडणी बंद” आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. उसाला एक रकमी एफआरपी मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी, त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा इत्यादी मागण्या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली. तर सांगलीत ट्रॅक्टर व बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात आली.